फेब्रुवारीत होणार्‍या मल्हार हेल्प फेेअर-2 साठी लोकसहभागातुन मदतीचे आवाहन

0
विद्यार्थ्यांमधे बालवयातच जॉय ऑफ गिव्हिंगचे संस्कार रूजवा- प्रकाश चौबे
फेब्रुवारीत होणार्‍या मल्हार हेल्प फेेअर-2 साठी लोकसहभागातुन मदतीचे आवाहन
जळगांव. दि.12- समाजातील गरजुंसाठी कार्य करणार्‍या संस्था व सेवादूतांचे कार्य समाजासमोर येवून त्यांच्या कार्याची दखल घेणे,  आजच्या युवा पिढीला सामाजिक क्षेत्रातील नवनवीन व्यवसाय संधी उपलब्ध करून मार्गदर्शन करणे, लहान वयातच शालेय विद्यार्थ्यांना सेवाभाव याचे महत्व जॉय ऑफ गिव्हिंगचे संस्कार रूजविले जावेत,त्यांना त्यांपासून प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तीन दिवसीय मल्हार हेल्प फेअर-2 चे आयोजन बॅ. निकम चौक, सागर पार्क मैदानावर शनिवार दोन ते चार फेबु्रवारी दरम्यान आयोजीत करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्था व सेवादूतांनी लोकसहभागाव्दारे मदत करावी असेे आवाहन येथे आयोजीत पत्रकार परीषदेत प्रकाश चौबे यांनी केले.
          यांची होती उपस्थिती-यावेळी रेडक्रासचे उपाध्यक्ष गनी मेमन, आनंद मल्हारा, नरेश खंडेलवाल,विजय काबरा, चंद्रशेखर नेवे, रेखा महाजन, समर्थ खटोड यांचे सह हेल्प फेअर समुहाचे सदस्य उपस्थित होते.
  हेल्प फेअरची संकल्पना – समाजात निःस्वार्थ हेतुने सर्वस्व अर्पण करून गरजुंसाठी कार्य करणार्‍या समाज स्वयंसेवी संस्था सेवादूत यांच्या माध्यमातुन गरजुसाठी कार्य करणार्‍या, उपेक्षित,पिडीत, अनाथ निर्वासीत,दिव्यांग यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना मदत, पालकत्व स्विकारणार्‍या दानशूर संवेदनशील व्यक्तींच्या कामाची दखल घेवून त्यांचा सन्मान करून आपण देखिल समाजाचे देणे लागतो हि भावना दृढ करण्यासाठी  दानशूर व्यक्तींच्या माध्यमातुन हेल्प फेअरची संकल्पना आहे.
हेल्प फेअर मधे शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक,विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थांचे कार्य, महानगरपालिका, जिल्हा परीषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातुन आयोजित उपक्रम योजनांची माहिती तसेच निःस्वार्थ कार्य करणार्‍या सेवामहर्षींची  माहिती, दिव्यांगांसाठी स्वावलंबन जिद्द व प्रेरणादायी जिवन याची माहिती यात अनुभवास येणार आहे, यात सेवा महर्षींची व्याख्याने, संस्था चालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 53 सेवाभावी संस्थांच्या सहभागासह 40 सेवामहर्षींची माहिती तसेच विद्यार्थ्यासाठी प्रेरणा ठरणारे 6 प्रात्यक्षिकांचे सादरीकरण होणार आहे.
या माध्यमातुन संस्थांच्या निधी संकलन, सेवा कार्याचा प्रचार प्रसारात वाढ, समाजासमोर जाण्याचे कौशल्य आत्मविश्वासात मदत, या सेवामहर्षीचा व सस्थांचा लौकीक वाढण्यास मदत झालेली आहे.
हेल्प फेअर उपक्रमासाठी 45 संस्थासह 25 व्यक्तींची सेवादूत म्हणून निवड करण्यात आलेली यात यजुर्वेंद महाजन,करीम सालार,डॉ, राजेश पाटील,नंदू आडवाणी,अनिल माळी, विनय पाठक,अमर कुकरेजा,विजय काबरा,प्रेम कोगटा, डॉ,प्रिती अग्रवाल,डॉ.रवी हिराणी,वर्धमान भंडारी, हादि कर् शहा, प्रशांत मल्हारा आदींचा सहभाग आहे.-

Leave A Reply

Your email address will not be published.