Wednesday, September 28, 2022

तांदुळवाडी परिसरात गाईवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव

- Advertisement -

कजगाव ता.भडगाव | प्रतिनिधी 

- Advertisement -

येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मनुष्यावर असल्याने पण सध्या जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यातच मौजे तांदुळवाडी तालुका भडगाव येथील शेतकरी चे उदाहरण निर्वाह फक्त गुरंढोरं वरच असल्याने त्यांचे कडील एच, एफ संकरित गाई साधारण दहा ते पंधरा गाईन मधून दोन  गाईंना लम्पी स्क्रीन डिसीज आजारामुळे दगावल्या मुळे साधारणता एक लाख ते सत्तर हजार पर्यंत या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात एक दिवस चूल देखील पेटला नाही. सध्या भडगाव तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या जोमाने चालू असल्याने जिल्ह्यात भडगाव तालुक्याचा मोठा क्रमांक दिसून येत आहे, आजूबाजूच्या गावात या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या चार संसर्ग केंद्रापासून दहा किमी बांधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात  येत असल्याने आदेश अभिजित राऊत साहेब  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  जिल्हा पत्ती निर्गमित केले आहे,  या आजाराचे लक्षणे. . ताप येणे, अंगावर गाठ होणे, पाय सुजणे, गाईंना उभे राहता येत नाही, हे एच एफ संकरित गाईंवर मोठ्या प्रमाणात अटॅक करते.  तरी तांदूळवाडी येथील श्री, सुधीर रमेश पाटील यांचे उदरनिर्वाहाचे साधन गाई असल्याने एक गाय साधारण 15 लिटर दूध देणारी व दोन गाई साधारण त्यांची किंमत एक लाख ते  सत्तर हजार असल्याने दोन गाई मृत्यू मुखी झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांना शासनाने गरीब शेतकऱ्याला हातभार लावा व तांदुळवाडी परिसरात गाईंवर असणारी 100% आलास त्वरित तांदळवाडी परिसरात कॅम्प घेऊन लसीकरण करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांना देण्यात येणार आहे, व तांदूळवाड़ी परिसरातील लवकरात लवकर कम्प घेण्यात यावा असी मागणी शेतकरी वर्ग व  पशुपालन करणार कडून होत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या