ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी माळी समाजातर्फे निवेदन (व्हिडीओ)

0

एरंडोल प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील संपुर्ण माळी समाजातर्फे आज तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांना ओ.बी. सी.समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले.

निवेदनात नुकतेच सुप्रीम कोर्टाने ओ.बी.सी.समाजाचे जिल्हा परिषद,ग्रामपंचायत,नगर पालिका,महानगर पालिका व इतर संस्थेत असलेले आरक्षण रद्द केलेले आहे. या निर्णयामुळे ओ.बी. सी.समाजाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. तरी केंद्र व राज्य सरकारने ओ.बी.सी.समाजाचे रद्द केलेले आरक्षण पुन्हा मिळवुन द्यावे असे म्हटले, असुन शेवटी अन्यथा ओ.बी.सी.समाज तीव्र आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामास केंद्र व राज्य सरकार राहील असा इशारा दिला आहे.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, दुर्गादास महाजन, माजी तहसिलदार अरुण माळी, पंकज महाजन,उमेश महाजन, तुषार महाजन, पियूष चौधरी, रविंद्र महाजन,दुर्गादास महाजन, संजय महाजन, राजेंद्र महाजन, अतुल महाजन, नगरसेवक कृणाल महाजन, कैलास महाजन, राजधर महाजन, एड.आकाश महाजन, लक्ष्मण महाजन, प्रकाश महाजन, पुंडलिक चौधरी,जयराम माळी, प्रविण महाजन,रविंद्र महाजन, प्रा.जितेंद्र महाजन, अक्षय महाजन, प्रशांत महाजन, दिपक महाजन, फकिरा चौधरी, रुपेश माळी, मनोज महाजन, हिम्मत महाजन, दिपक महाजन, गोपाल चौधरी, पांडुरंग महाजन आदी असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.