Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»राजकारणात 90% महिलांच्या कारकिर्दीची सुरुवात नेत्यांच्या…
    राजकारण

    राजकारणात 90% महिलांच्या कारकिर्दीची सुरुवात नेत्यांच्या…

    राजकीय नेत्याची जीभ घसरली : मैथिली ठाकूर संतापल्या
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2026No Comments299 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राजकीय नेत्यांनी अनेकदा वक्तव्य करत असताना जीभ घसरते. आता देखील असंच काही झालं आहे. बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव उर्फ ​​राजेश रंजन यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू असलेला वाद दिवसागणिक अधिक पेटत आहे… पप्पू यादव यांच्या वक्तव्यानंतर इतर पक्षातील नेते देखील निशाण्यावर आले असताना, भाजप खासदार मैथिली ठाकूर यांनी संताप व्यक्त करत तिव्र प्रतिक्रिया दिली आहे.

    काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी भारतीय राजकारणात महिलांच्या भूमिकेबद्दल मोठं विधान केलेलं. पप्पू यादव म्हणालेले, ‘राजकारणात 90% महिलांच्या कारकिर्दीची सुरुवात नेत्यांच्या शय्येवरून सुरु होतो…. आता राजकारणात महिलांना बळीचा बकरा बनवण्याची संस्कृती रुजली आहे…’, असं वादग्रस्त विधान पप्पू यादव यांनी केलं.

    पप्पू यादव यांच्या विधानावर मैथिली ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे… ‘मला नाही वाटत की, अशा लोकांना माफ केलं पाहिजे… त्यांनी माफी मागितली तरी त्यांनी मी माफ करु शकणार नाही. कारण त्यांनी फार मोठा आघात केला आहे. पप्पू यादव यांनी केलेलं विधान अत्यंत असभ्य आहे.’

    ‘मी स्वतः अशा कुटुंबातून येते, जेथे कुठेही जाण्यापूर्वी आम्ही त्या जागेबद्दल सर्व माहिती मिळवतो… तिथलं वातावरण कसं आहे ते पाहतो… माझ्या वडिलांचा विश्वास आहे, म्हणून त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं… त्यांनी महिला नेत्यांवर खूप मोठा कलंक लावला आहे.’, असं मैथिली ठाकूर म्हणाल्या.

    पप्पू यादन यांनी महिला नेत्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. तेव्हा त्यांनी माफी मागितली. पण माफी मागताना त्यांनी एक अट देखील ठेवली. पप्पू यादव म्हणाले, ‘जर माझ्या शब्दांमुळे महिलांना ठोस पोहचली असेल तर, मी माफी मागतो. पण ही माफी फक्त माझ्या बहिणी आणि माझ्या मुलींसाठी आहेत. नेत्यासाठी नाही…’ पुढे पप्पू यादव म्हणाले, त्यांचा विरोध घाणेरड्या राजकारण्यांना आहे. ज्यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांवर मी गिधाडांना नजर टाकू देणार नाही… असं देखील पप्पू यादव म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

    September 16, 2026

    धनंजय मुंडे तातडीने रूग्णालयात दाखल

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif