सोन्याच्या किंमतींमध्ये घट, चांदीही घसरली ; जाणून घ्या दर

0

मुंबई : जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी (20 एप्रिल) भारतातील सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) जून वायदा सोन्याच्या भावात 0.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरांत घट दिसत असताना उलट, चांदीमध्ये काहीशी तेजी झाल्याचे दिसले आहे. मे वायद्याच्या चांदीचा दर 0.45 टक्क्यांनी वाढला आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत वाढून, दोन महिन्यांच्या उच्चांकी किंमतीवर प्रति 10 ग्रॅम 47,850 रुपये झाली होती.

सोन्याचे भाव: 

मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याची किंमत 139 रुपयांनी घसरून, 47245 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. मागील सत्रात सोने 47,850 रुपयांवर पोहोचले होते.

चांदीचा भाव:
औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीला सुगीचे दिवस आले आहेत. एमसीएक्सवर मे वायदा चांदीचे दर 225 रुपयांनी वाढून, 68635 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले.

जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरांत मंदीचे वातावरण आहे. अमेरिकन ट्रेझरी यील्ड्सच्या रिबाऊंड दरम्यान सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली. परंतु, कमजोर पडलेल्या डॉलरने ही घसरण काहीशी कमी केली. गेल्या सत्रात प्रति औंस 1,789.77 डॉलरवर पोहोचल्यानंतर, स्पॉट गोल्ड आज 0.2 टक्क्यांनी घसरून 1,766.32 डॉलर प्रति औंस झाले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.