जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. आज जिल्ह्यात ९८६ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे तर आजच ४१८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. दरम्यान, आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ६९ हजार ६४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ९३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार २७५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर- ३५०, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-८९, अमळनेर-०२, चोपडा-१४१, पाचोरा-४६, भडगाव-०२, धरणगाव-३४, यावल-३२, एरंडोल-७९, जामनेर-६७, रावेर-२४, पारोळा-३३, चाळीसगाव-०९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण ९८६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.