8 मार्च नंतर लॉक डाऊन हटविणार ; निर्बंध मात्र कायम

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात कोरोणा बाधित रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढल्याने . अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी मध्ये लाॅकडाऊन लावण्यात आले होते. तर उर्वरित जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली होती . ही संचार बंदी अमरावती जिल्ह्यात आठ मार्च पर्यंत लावण्यात आली होती.  मात्र या संचारबंदी काळात अनेक राजकीय नेते, सामाजिक संघटना, व्यापारी यांनी या लॉकडाउन वर आक्षेप घेतला. त्यामुळे आठ मार्च 2021 नंतर जिल्ह्यात लॉकडाऊन राहणार नसल्याचे संकेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

 

अमरावती जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर जिल्ह्यात  संचारबंदी लावण्यात आली होती. या संचारबंदी मध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानांना दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.  8 मार्च 2021 पर्यंत ही संचारबंदी अमरावती जिल्ह्यात लागू केली होती . या संचार बंदी मुळे कोरोना चे रुग्ण कमी होण्यास मदत होईल असे प्रशासनाला वाटत होते . परंतु पंधरा दिवसात लाॅकडाऊन च्या काळात कोरोना बाधित रुग्ण काही कमी होण्यास मदत झाली नाही. उलट लाॅकडाउन च्या काळात छोटे व्यावसायिक , मोलमजुरी करणारे नागरिक  त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

 

तर अनेक व्यापाऱ्यांनी या लॉक डाऊन ला विरोधही दर्शविला . सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा अमरावती जिल्ह्यातील लाॅकडउन चा मुद्दा चांगलाच चर्चिला गेला. त्यामुळे आता आठ मार्च नंतर अमरावती जिल्ह्यात लाॅकडाउन राहणार नसल्याचे संकेत जिल्हाधिकार्‍यांनी दिले . मात्र काही अटी व शर्ती नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लावण्यात येणार आहे.  या सोबतच सर्व दुकानांची वेळ सकाळी नऊ वाजता पासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोविड-19 चे शासकीय नियम तोडणाऱ्या वर कडक कारवाई केल्या जाणार आहे. यासोबतच आस्थापनांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पथकाद्वारे दररोज तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीसांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.