बुलडाणा : जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2020-2021 मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेड राजा, चिखली, बुलडाणा, दे. राजा, लोणार व मेहकर तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ येाजना व नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील देऊळगांव धनगर, कोनड खु, धोत्रा नाईक, अमोना, रोहडा, गुंजाळा, अंचरवाडी, काटोडा, एकलारा, किन्ही नाईक, सावरगांव डुकरे, खैरव, भालगांव या गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरखेड, दत्तापूर, लिंगा येथे नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. तसेच लोणार तालुक्यातील धायफळ, जाफ्राबाद, पार्डा दराडे, टिटवी, दे. राजा तालुक्यातील दे. मही, गिरोली खु, बोराखेडी बावरा, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी, अंभोडा, तराडखेड, मेहकर तालुक्यातील खानापूर, घाटबोरी, दादुलगव्हाण व गणपूर गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दे. राजा तालुक्यातील सेवानगर, सिं. राजा तालुक्यातील बुट्टा, चिखली तालुक्यातील पिंपरखेड, कारखेड, हराळखेड, गांगलगाव, मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा, बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड गावामध्ये तात्पुरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. मंजूर तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर तात्पुरती पूरक नळ योजना किमान 3 वर्षासाठी कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई विभागाने कळविले आहे.