लोकशाही न्यूज नेटवर्क

नेपाळमध्ये सध्या हाहाकार माजला आहे. 26 ऑगस्टच्या सकाळी नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. या विध्वंसानंतर अशी माहिती देखील समोर येत आहे की, सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाउंडेशन’शी संबंधित किमान 77 यात्रेकरू बेपत्ता झाले आहेत. हे यात्रेकरू कैलास मानसरोवर यात्रेवरून परतत होते आणि अचानक पूर आला तेव्हा ते तिबेटमधील ग्यिरोंग येथील इमिग्रेशन सेंटरमध्ये होते. सद्गुरु यांनी एका ऑनलाइन पोस्टद्वारे या घटनेबद्दल सांगितलं.
नेपाळ पर्यटन मंडळाने बेपत्ता घोषित केलेल्या 105 भारतीय कैलास यात्रेकरूंपैकीच हे 77 जण आहेत, जे सध्या ‘ग्यिरोंग’ येथील इमिग्रेशन कार्यालयात आहेत असं मानलं जात आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या रिपोर्टनुसार, पूरग्रस्त भागात किमान 384 यात्रेकरूंशी संपर्क तुटला. यात 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. परिणामी, पुरामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
सद्गुरुंनी दिलेल्या माहितीनुसार, या तीर्थयात्रेत सहभागी असलेल्या 21 गटांमधील एकूण 495 लोक सुरक्षितपणे परतले आहेत. दरम्यान, 743 लोक तिबेटमध्ये, तर 148 लोक नेपाळमध्ये आहेत. सद्गुरूंनी असं देखील सांगितलं आहे की, त्यांचे तीन स्वयंसेवक सध्या नेपाळमधील तिमुरे येथे आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, कैलास मानसरोवर यात्रेशी संबंधित अनेक लोक सध्या विविध ठिकाणी अडकले आहेत आणि त्यांच्याशी सुरक्षित संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सांगायचं झालं तर. नेपाळमध्ये सकाळी 8 वाजून 37 मिनिटाने भूकंप आला. त्यानंतर 8 वाजून 45 मिनिटाचा ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटरच पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळला. नेहमीप्रमाणे आज सकाळीही या इमिग्रेशन सेंटरवर मोठी गर्दी होती. तेथीस कित्येत लेकं आता बेपत्ता आहेत.


