70 वर्षात जे घडलं नाही ते आता घडलं; जितेंद्र आव्हाड

0

मुंबई –

70 वर्षात जे घडलं नाही ते पहिल्यांदाच घडलं,  रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने कार्यकाल पूर्ण व्हायच्या अगोदर राजीनामा दिला, याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना या घटनेचं श्रेय जात नाही तर ते श्रेय नरेंद्र मोदींना जातं, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला, यावरून विरोधी पक्ष आता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत.

दरम्यान, उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यातून मोदी सरकार रिझर्व्ह बँकेच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचं स्पष्टपणे दिसतं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.