Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
    ताज्या बातम्या

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 15, 2026No Comments667 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महासभेत झाले शिक्कामोर्तब : कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

    जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी बुधवार दि. 15 एप्रिल रोजी झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय 7 उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे 4, शिवसेना (शिंदे गट) 2 आणि शिवसेना (ठाकरे गट) 1 अशा सदस्यांचा समावेश आहे. निवडीची घोषणा होताच महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष करण्यात आला.
    महासभेत पीठासीन अधिकारी तथा महापौर दीपमाला काळे यांनी नवीन स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. यात भारतीय जनता पक्षतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे, सुभाष शौचे, शिवसेना (शिंदे गट)तर्फे हर्षल मावळे, नरेंद्र आत्माराम पाटील, शिवसेना (ठाकरे गट)तर्फे महानगरप्रमुख शरद तायडे यांची निवड झाली. निवडीनंतर महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या विशेष महासभेला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगर सचिव सतीश शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. निवडीची प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यानंतर आता महापालिकेत एकूण 82 नगरसेवक झाले आहेत. यात भाजपचे संख्या 46 वरून 50, शिवसेनेची संख्या 25 तर शिवसेना ठाकरे गटाची संख्या 7 वर पोहोचली आहे. महासभा संपल्यानंतर नवनियुक्त नगरसेवकांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिका परिसरात मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या प्रांगणातून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif