महाकुंभ मेळ्यावरून परतताना भीषण अपघातात ७ ठार

भाविकांनी भरलेली बस ट्रकला धडकली : अनेक जखमी

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ अपघात घडला आहे. या भीषण अपघातात प्रवासी बस एका ट्रकला धडकली. ज्यात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झालाय. तर, अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर झाली आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९:१५ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा बसचा भीषण अपघात घडला. प्रवासी बस एक ट्रकला धडकली. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बस आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की, बसच्या काही भागाचे तुकडे झाले आहेत. स्थानिक लोक ट्रकच्या छतावर चढून प्रवांशाची मदत करत आहेत. घटनास्थळी क्रेन देखील पोहोचली आहे. या अपघातात आणखी कुणी बसमध्ये अडकले आहेत का? याचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस प्रयागराज महाकुंभ मेळ्यातून परतत होती. मोहला आणि बर्गी गावादरम्यान बस पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. सिमेंटनं भरलेला ट्रक चुकीच्या दिशेनं येत होती. त्यामुळे हा अपघात घडला असल्याचं बोललं जातंय. बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकल्याची माहिती आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसमधील प्रवासी हे आंध्र प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.