Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू
    अपघात

    केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अहमदाबादहून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना अजून धगधगत असताना आता केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशन कंपनीचं एक हेलिकॉप्टर कोसळलं. केदारनाथमधील गरुडचट्टीजवळ हा मोठा अपघात झाला. या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी साधारण 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे.

    केदारनाथमधील गौरीकुंड परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. यानंतर त्या ठिकाणी गवत कापणाऱ्या महिलांनी तात्काळ प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ  आणि एसडीआरएफच्या टीम्स लगेच घटनास्थळी पोहोचल्या. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबत 5 प्रौढ आणि दोन लहान मुलं प्रवास करत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अनेक अवशेष विखुरलेले पडले आहेत. या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केली आहे. “जनपद रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. यासाठी केदारनाथांकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” असे पुष्कर सिंह म्हणाले.

    दरम्यान चारधाम यात्रेदरम्यान भाविक त्रास टाळण्यासाठी आणि चढाई न करता हेलिकॉप्टरचा वापर करतात. मात्र, अलीकडच्या काळात केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका हेलिकॉप्टरला रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी उड्डाण करण्यापूर्वीच आणखी एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता.१७ मे रोजी केदारनाथमध्ये एक एअर एम्ब्युलन्स हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट, डॉक्टर आणि नर्स असे तीन जण होते. सुदैवाने ते तिघेही सुरक्षित बचावले होते. हे हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधून रुग्णाला आणण्यासाठी केदारनाथला जात होते. त्यावेळी लँडिंग करताना हा अपघात झाला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते.

    #killed accident Crash Helicopter Helicopter Crash Helicopter Crash In Kedarnath Kedarnath
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या

    July 19, 2026

    सोनम वांगचुक यांच्या पत्नीची थेट दिल्ली हायकोर्टात धाव

    July 19, 2026

    युक्रेनचे रशियावर ड्रोनने हल्ले : ९ ठार, १५० अधिक जखमी

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif