देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘७/१२’ लघुपटाचा डंका
'द लॉस्ट पॅराडाईस' सर्वोत्कृष्ट माहितीपट : ५ व्या आंतरराष्ट्रीय फेस्टिवलचा समारोप
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अजिंठा फिल्म सोसायटी, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि के. सी. ई. सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल जळगाव येथील एम. जे. महाविद्यालयात दिमाखात पार पडला. या दोन दिवसीय महोत्सवात देश-विदेशातील ३०० हून अधिक लघुपटांनी सहभाग नोंदवला होता, ज्यापैकी ८० विशेष लघुपटांचे स्क्रीनिंग करण्यात आले.
या सोहळ्यात अक्षय प्रकाश वास्कर दिग्दर्शित ‘७/१२’ या लघुपटाने लघुपट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावून महोत्सवाचा मुख्य बहुमान मिळवला. तर माहितीपट श्रेणीत अविनाश श्रीराम शेंबाटवाड यांच्या द लॉस्ट पॅराड़ाईस ला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
पुरस्कारांचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे:
मुख्य श्रेणी – लघुपट ‘७/१२’ (प्रथम), ‘मीरा ‘ (द्वितीय), ‘केकी ‘ (तृतीय).
* माहितीपट -द लॉस्ट पॅराड़ाईस ‘ (प्रथम), तहानलेला दाता’ (द्वितीय).
* कॅम्पस फिल्म: ‘निर्वाण ‘ (प्रथम).
* बालचित्रपट: ‘व्हीलस’ (प्रथम).
वैयक्तिक पारितोषिके :
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अक्षय चंद्रकला प्रकाश वास्कर (चित्रपट: ७/१२).
* सर्वोत्कृष्ट पटकथा: डॉ. जीवन एस. रजक (चित्रपट: त्वमेव सर्वम).
* सर्वोत्कृष्ट अभिनेता: चिन्मय पटवर्धन (चित्रपट: द फिनिश लाईन).
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आरती बिराजदार (चित्रपट: मीरा).
* सर्वोत्कृष्ट बालकलाकार: स्वराज्य कोळेकर (चित्रपट: खेळणा).
* सर्वोत्कृष्ट छायांकन -कुलदीप सिंग रावत (चित्रपट: ऐना).
* सर्वोत्कृष्ट संकलन -जागेश्वर ढोबळे (चित्रपट: केकी)
अजिंठा फिल्म सोसायटी, राज्य सास्कृतिक कार्य संचालनालय तसंच कान्ह ललित कला केद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दोन दिवशीय महोत्सव मू. जे. महाविद्यालय जळगाव येथ आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कान्ह ललित कला केंद्राने सप्तकलांचे आपल्या सादरीकरणातुन दर्शन घडविले. यावेळी प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. अत्यंत मानाचा मानला जाणारा यंदाचा देवगिरी चित्र गौरव पुरस्कार आरोह वेलणकर आणि सुरभी हांडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भेटायला नव्हे तर संपवायला गेले होते : दिग्पाल लांजेकर
सकाळच्या सत्रात ‘दिग्दर्शकाच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या शिर्षकाची दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुणे यांची प्रकट मुलाखत डॉ. शमा सराफ यांनी घेतली. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि डॉ. शमा सराफ यांच्यातील संवाद हा प्रामुख्याने ‘शिवराज अष्टक’ आणि ऐतिहासिक चित्रपटांच्या प्रवासावर भाष्य करणारा होता.
या दोघांमधील मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे -:
दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील आठ महत्त्वाच्या घटनांवर चित्रपट काढण्याचा जो संकल्प केला आहे, त्यामागची प्रेरणा केवळ मनोरंजन नाही, तर पुढच्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोहोचवणे. डॉ. शमा सराफ अनेकदा इतिहासाची सत्यता आणि चित्रपटात घेतलेली ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ यावर मार्मिक प्रश्न केला.. दिग्पाल म्हणाले कि “इतिहासाला धक्का न लावता, तो प्रेक्षकांना भावेल अशा पद्धतीने मांडणे हे मोठे आव्हान असते. “याकरिता योग्य पात्रनिवड अजय पुरकर (बाजीप्रभू देशपांडे), मृणाल कुलकर्णी (राजमाता जिजाऊ) महत्वाची असते. चित्रपटाचे चित्रीकरण करताना येणाऱ्या अडचणी, विशेषतः गड-किल्ल्यांवर शूटिंग करतानाचे अनुभव यावर या संवादात प्रकाश टाकला गेला.
दिग्पाल यांनी सांगितले की, केवळ ‘बाजीप्रभू’ माहिती होते, पण त्यांच्यासोबत असणाऱ्या ३०० मावळ्यांच्या शौर्याची धार पडद्यावर आणण्यासाठी त्यांनी जेजुरी आणि कोल्हापूर परिसरातील अनेक जुन्या जाणकारांशी संवाद साधला होता. अफझलखानाचा वध करताना वापरलेली शस्त्रे आणि त्यावेळची मानसिक स्थिती यावर सखोल चर्चा झाली. यावेळी प्रातिनिधिक प्रश्न प्रेक्षकांनी विचारले त्याला दिग्पाल लांजेकर यांनी समर्पक उत्तरे दिली. दुपारी ०३:०० वा. होणाऱ्या ओपन फोरम सत्रात योफिमा शिष्यवृत्ती २०२५ -२६ चे विजेते युवा चित्रकर्मी सह सुप्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर यांनी चर्चा केली. 28 व 1 मार्च दरम्यान मू. जे. महाविद्यालय कान्ह ललित कला केंद्र दादासाहेब फाळके चित्रनगरीत हा महोत्सव संपन्न झाला.
या फेस्टिवलसाठी 300 देश विदेशातून शॉर्टफिल्म आल्या असून विशेष 80 शॉर्टफिल्म दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी भारतीय चित्र साध नाचे राष्ट्रीय सचिव अतुल गंगवार, नवी दिल्ली संस्कार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री अभिजीत गोखले मुंबई, येथील प्रमोद बापट, प्रांत सहकार्यवाह स्वानंदजी झारे, अभिनेता आरोह वेलणकर, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोकभाऊ जैन, रामलाल चौबे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, केतकीताई पाटील, केसीई सोसायटीच्या संचालक डॉ शिल्पा बेंडाळे, श्री. भालचंद्र पाटील, कान्ह ललित केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, जैन उद्योग समूह मिडीया प्रमुख अनिल जोशी, नितीन भास्कर, प्रांत संयोजक किरण सोहळे, प्रांत सह संयोजक विनीत जोशी, डॉ. जयंत लेकुरवाळे, प्रा. सुचित्रा लोंढे यांच्या सह शेकडो रसिक उपस्थित होते.
या दोन दिवसीय महोत्सवात शॉर्टफिल्मचे स्क्रिनिंग, मास्टर क्लास, टुरिंग टॉकीजचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र शासन, फिल्म सिटी, जैन उद्योग समुह, श्री. रामलाल चौबे ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे. या दोन दिवसीय महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, कान्ह कला केंद्राचे शशिकांत वडोदकर, प्रसाद देसाई, हास्य जत्रा फेम नाट्यकलावंत हेमंत पाटील, फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल भोळे, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, सहसचिव डॉ. सुचित्रा लोंढे, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, उपाध्यक्ष पंकज सोनवणे, अँड. प्रसाद गोडबोले तथा चित्रसाधना प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रध्दा पाटील आणि ॲड. अनघा गोडबोले यांनी केले.