नू.मा.वित गुणवंतांचा सत्कार

0

चिनावल, ता:रावेर : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी मधील यशवंत गुणवंतांचा सत्कार समारंभ सामाजिकअंतराचे नियम पाळून आयोजित करण्यात आला.

याप्रसंगीअध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माननीय किशोर बोरोले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य विनायक महाजन प्रभारी मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे पर्यवेक्षक पी.एम.जावळे उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावी मध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

यात प्रथम आचल चंद्रशेखर किरंगे ९६.६०,प्राची प्रशांत आंबेकर ९४.४०,डिंपल सुहास नेहेते ९३.८० यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यशवंतांनी आपल्या मनोगतात शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.आपल्या अध्यक्षीय भाषणात चेअरमन किशोर बोरोले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रती नम्र रहा जीवनात मिळणार यश आपल्या चांगुलपणावर अवलंबून असतं असे प्रतिपादित केले.आभार शिक्षक प्रतिनिधी सौ.लिना कोल्हे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.