मोहाडी येथील सरपंचाकडून कोरोना योध्दाना किटचे वाटप

0

जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मोहाडी येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच भाविनी रामचंद्र पाटील यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत एक पाऊल पुढे टाकत खासदार सी.आर.पाटील यांचे प्रेरणेने आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात लोकडाऊनमुळे अहमदाबाद येथे अडकलेले असूनसुद्धा अतिशय नियोजनबद्धपणे संपूर्ण गावाला ३ हजार मास्क,आणि प्रत्येक कुटुंबाला एक असे सहाशे सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. सर्व नियमांचे पालन करून कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी या वस्तूंची गावातील कोरोना समितीच्या टीमने घरोघरी जाऊन याची वाटप केली आणि कोरोना बद्दल जणजागृती मोहिमही राबविली. गावात कृतीशील कोरोना समिती स्थापन करत गावात निर्जंतुकीकरणासाठी ४ वेळा संपूर्ण गावपरिसरात फवारणी सुद्धा करण्यात आली.गावात बाहेरून आलेल्या लोकांना प्रशासनाच्या नियमानुसार विलगीकरन करून काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.

फक्तगावातच नाही तर जामनेर पोलीस स्टेशन,नेरी आउटपोस्ट,जामनेर तहसील ऑफिस तसेच कोरोना युद्धात काम करणाऱ्या पत्रकार बांधव यांनासुद्धा मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून मोहाडी गावाचे जे लोक सुरत येथे अडकलेले आहेत त्यांना सुद्धा किराणा किट पोहचवण्याचे काम खासदार सी.आर.पाटील करत आहेत.गावात सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे यासाठी समितीचे सदस्य डॉ. गिरीश पाटील,ग्रामसेवक सोनवणे,ग्रा.पं.सदस्य भगवान कोल्हे,कामीनी कोळी,पोलीस पाटील रमेश बागुल,आशा कार्यकर्ती सुनीता कापडे,कविता कोळी,अंगणवाडी सेविका शोभाताई तायडे,मीराबाई बागुल,मुक्ताबाई पाटील, कोतवाल मोहन बावस्कर,पवन कोळी,प्रदीप पाटील आदिसह ग्रामस्थांनी यासाठी परीश््रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.