Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गडचिरोलीत मास्टरमाईंडसह ६१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
    गुन्हे वार्ता

    गडचिरोलीत मास्टरमाईंडसह ६१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 14, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी टीव्ही ९ मराठीला दिली आहे. विशेष म्हणजे, या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षलवादी चळवळीतील एक महत्त्वाचे आणि केंद्रीय समितीचे मोठे सदस्य सोनू ऊर्फ भुपती यांचा समावेश आहे. यामुळे नक्षलवादी चळवळ कमालीची खिळखिळी झाल्याचे बोलले जात आहे.

    गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे हे सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण आत्मसमर्पण ठरले आहे. या आत्मसमर्पण केलेल्या ६१ नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सर्वच मोठ्या नक्षलवादी कॅडरचा समावेश आहे. यामुळे या भागातील नक्षलवादी कारवायांना आणि त्यांच्या मनुष्यबळाला मोठा धक्का बसला आहे.

    सोनू ऊर्फ भुपतीची ओळख

    सोनू ऊर्फ भुपती याचे मूळ नाव मल्लोजुला वेणुगोपाल राव असे आहे. हा नक्षलवादी (माओवादी) पक्षाच्या पोलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य आहे. तो ६९ वर्षांचा असून, बीकॉम पदवीधर आहे. नक्षलवादी चळवळीतील अत्यंत वरिष्ठ आणि महत्त्वाचा सदस्य म्हणून त्याची ओळख आहे. तो महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील माड डिव्हिजन मध्ये सक्रिय होता. तो गेल्या ४० वर्षांपासून संघटनेत सक्रिय होता. त्याच्यावर गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांची जबाबदारी होती. त्याच्यावर जवळपास साडेपाच ते सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

    भूपती हा माजी महासचिव बसवराजू यांच्या मृत्यूनंतर तो पक्षाच्या सर्वोच्च पदाचा एक संभाव्य दावेदार मानला जात होता. त्याचा धाकटा बंधू किशनजी (मल्लोजुला कोटेश्वर राव) २०११ मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत मारला गेला होता. भुपतीची पत्नी तारक्का हिने गेल्या वर्षीच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. ती सध्या पोलीस पुनर्वसन शिबिरात राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच भुपतीने केंद्र सरकारला शांतता वार्ताच्या चर्चेसाठी तसेच तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी पत्र लिहिले होते.

    दरम्यान सध्या आत्मसमर्पण केलेल्या या सर्व माओवाद्यांवर कोणकोणत्या पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे दाखल आहेत आणि प्रत्येकावर किती बक्षीस आहे, याची सखोल माहिती गडचिरोली पोलीस विभाग पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे घेत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!

    November 9, 2026

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif