जळगाव- गाळेधारकांना दिलेल्या 11 ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या मुदतीत कारवार्इ टाळण्यासाठी सेंल व फुले मार्केटमधील 61 गाळेधारकांनी 2 कोटी 98 लाख78 हजार717 रुपयांची थकबाकी चेकद्वारे मनपा प्रशासनाकडे जमा केल्याची माहिती उपायुक्त महसूल डॉ. उत्कर्ष गुटे यांनी दिली. सुटीच्या दिवशीही मनपा कार्यालय राहणार खुले महापालिकेच्या मुदत संपलेल्या गाळेधारकांना कलम 81 नुसार नोटीस बजावण्यात येवून 30 जुन पर्यंतची बिले भरण्यासाठी दि. 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. दि. 11 अखेर 50 गाळेधारकांनी पुर्ण रक्कमेची थकबाकी दिली आहे. शुक्रवारी दिवसभर गाळेधारकांचा थकीत बाकी भरण्यासाठी ओघ सुरु होता. तर सोमवार पासून गाळेधारकांवर कारवार्इ करण्यात येणार आहे. तत्पुर्वी शनिवार व रविवारी चेक स्वीकारले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी सांगितले. प्रदिपकुमार जैन यांचा सत्कार सेंल फुले मार्केटमधील 57 लाखांची थकबाकी भरुन निल सर्टीफिकेट मिळविणारे पहिले गाळेधारक प्रदिपकुमार जैन यांचा महापालिकेत शुक्रवारी संध्याकाळी आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गाळेधारकांचे बँकखाते होणार सील? गाळेधारक थकीत भाडे थकविणाऱ्या गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे मनपा सुत्रांकडून समजते. मनपाच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपलेली आहे. त्यामुळे त्यांना 81 क ची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना दि. 11 पर्यंत मुदत देण्यात आली होती. शुक्रवारी शेवटचा दिवस होता.मात्र कारवार्इला सुटीचे दोन दिवस शिल्लक असल्याने सुटीच्या दिवशी चेक स्वीकारण्यात येणार आहेत. मात्र यानंतर सोमवारी गाळेधारकांची बँक खाती सील करण्यात येणार असल्याचे समजते. शिक्षकांना दोन मह्न्यािंचे वेतन मिळणार थकीत 18 महिन्यांपैकी एक व चालू वर्षातील सप्टेंबरचे असे दोन महिन्यांचे वेतन निवृत्तांचे वशिक्षकांचे होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. टेकाळे यांनी दिली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष समाधान सोनवणे, सल्लागार हरिशचंद्र सोनवणे, मनीषा सुर्यवंशी, इमरान खाटीक यांनी शुक्रवारी संध्याकाळी आयुक्तांची भेट घेवून दिवाळीपुर्वी वेतनाची मागणी केली.त्यामुळे येत्या चार दिवसांत शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी अंदाचे दीड कोटीची तजवीज प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.