मथुरेत खोदकामावेळी ६ घरे कोसळली

एकाचा मृत्यू : १२ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील गोविंद नगर पोलीस स्टेशन परिसरातील माया टीला शाहगंज येथे उत्खननादरम्यान मोठी दुर्घटना घडली. खोदकामावेळी ६ घरे कोसळली असून, किमान १२ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने पोहोचले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पथके ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्या लोकांना शोधण्याचे काम करीत आहेत. सीओ सीटी भूषण वर्मा म्हणाले, ‘मसानी पोलीस स्टेशन परिसरात आम्हाला एक इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. सध्या ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. महापालिकेचे एक पथक जेसीबीसह घटनास्थळी उपस्थित आहे. ढिगाऱ्याखाली आणखी किती लोक अडकले आहेत, याचा तपास सुरू आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या वादळामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्खननाच्या वेळी सुमारे सहा घरे कोसळल्याचीही माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.