5G चा शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लॉन्चिंग…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज भारतात (India) 5G सेवा सुरू केली पंतप्रधान मोदींनी 5G लाँच केल्यानंतर आजपासून देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. 2023 पर्यंत ही सेवा संपूर्ण देशात विस्तारण्याची योजना आहे. दिल्लीत आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींनी ही सेवा सुरू केली. अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेटला समर्थन देण्यास सक्षम असलेली पाचवी पिढी किंवा 5G सेवा भारतीय समाजाला एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक लाभ प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

5G इंटरनेट (Internet) सेवेला 4G पेक्षा दहापट जास्त स्पीड (Speed) मिळेल, ज्यामुळे लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी आणि मूव्ही (Movie) गेम्स (Games) अॅप्स (Apps) आणि इतर गोष्टी डाउनलोड (Download) करण्यासाठी खूप कमी वेळ लागेल. मोबाईलमधील इंटरनेटचा वेग वाढल्याने इंटरनेटवर आधारित अनेक कामे सोपी होणार आहेत.

5G सेवा सुरू करण्यापूर्वी, PM मोदींनी दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडियन मोबाइल काँग्रेस (IMC) च्या 6 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. येथे रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी पंतप्रधान मोदींना (Prime Minister Narendra Modi) 5G सेवेबद्दल माहिती दिली.

देशातील या शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली

पहिल्या फेरीत आजपासून देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे.

या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.