0

पारोळा | प्रतिनिधी

तालुक्यातील म्हसवे येथे आज दिनांक अकरा रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून घरातील कापसाचे पेमेंट 80 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत येथील शेतकरी गोपाल जगन ठाकूर हे आज गावातील भिल्ल समाजाचे लग्न शिरपूर येथे असल्या कारणाने ते लग्नासाठी गेले होते व त्यांची पत्नी ह्या धुळे येथे रुग्णालयात उपचारासाठी गेले असताना दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाटात असलेले कापसाचे पेमेंट 80 हजार रुपये चोरून नेले. पंधरा दिवसापूर्वी कापूस विकला असता चार दिवसापूर्वी कापसाचे पेमेंट 80 हजार रुपये आल्याने घरात गोदरेज कपाटात ठेवलेले असताना कुलूप तोडून कपाटातील रक्कम चोरून नेली. घटनास्थळी सपोनि रविंद्र बागुल हे कॉ रवींद्र रावते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर यापूर्वीही ठाकूर यांचे जलपरी चोरीस गेली होती तीही गावातीलच चोरट्यांनी चोरली असल्याचे निष्पन्न झाले होते तर चोरी करताना गावात एक बाई बाहेर उभी असताना एक पुरुष घरात चोरी करत असल्याचे काही महिलांनी बघितले पण घरातील ठाकूर यांची सासू असल्याचे पाहून कोणी लक्ष दिले नाही.या चोरी बाबत म्हसवे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.