पोलिसांची कारवाई; तब्बल ५३ किलो गांजा जप्त…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दि १८ रोजीच्या मध्‍यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर जळोदहुन अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून नेत असलेला ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्‍त केला आहे. यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा सुमारे १२ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्‍हेंबरच्‍या रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. जळोद– अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकीमध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजयनाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा लावला. काही वेळानंतर मध्‍यरात्रीनंतर १८ नोव्‍हेंबरच्‍या पहाटे १ वाजेच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे मोटरसायकल येताना दिसली. पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी सतर्क होताच कार चालक आणि मोटरसायकल चालक यांनी वाहने ताबडतोब वळवून उलट्या दिशेने पळवायला लागले, पोलिसांनी देखील त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींना आपण पकडले जाणार या भितीने त्यांनी चारचाकी खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here