Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जुन्या वादातून डंपर अंगावर घालून ५२ वर्षीय व्यक्तीचा खून
    गुन्हे वार्ता

    जुन्या वादातून डंपर अंगावर घालून ५२ वर्षीय व्यक्तीचा खून

    नांद्री बसस्थानकाजवळील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 2, 2026No Comments236 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जुन्या वादातून चौघांनी संगनमत करून डंपर अंगावर घातल्याने नगाव येथील शरद रतन पाटील (५२) यांचा मृत्यू झाल्याची घटना नांद्री बसस्थानकाजवळ ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी आणि भरत सुभाष पाटील (सर्व रा. नगाव) यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ज्ञानेश्वर काळुगीर गोसावी (५२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी वाळूचे ट्रॅक्टर मागे घेताना धक्का लागल्याच्या कारणावरून विपुल गोसावी, सागर गोसावी व मयूर बोरसे यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आली होती. या घटनेचे साक्षीदार असलेल्या शरद पाटील यांना दुसऱ्या दिवशी विपुल गोसावी याने रस्त्यावर भेटल्यास चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

    ३१ ऑक्टोबर रोजी नगाव खुर्दचे पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फिर्यादीसह शरद पाटील व अन्य ग्रामस्थ देव हॉटेलकडे जात होते. रात्री ९.४५ वाजता नांद्री बसस्थानकाजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी ते थांबले असताना पातोंड्याकडून आलेल्या राखाडी रंगाच्या मारुती कारमधून विपुल गोसावी, मयूर बोरसे व सागर गोसावी उतरले. त्यांच्या पाठोपाठ एचआर-३७-डी-८९५७ क्रमांकाचा डंपरही तेथे आला. डंपर चालक भरत पाटील याने ग्रामस्थांना शिवीगाळ केली.

    यावेळी झालेल्या वादात विपुल गोसावी याने डंपर चालकाला ग्रामस्थांना उडवून देण्यास सांगितले, तर मयूर बोरसे व सागर गोसावी यांनीही त्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर चालकाने डंपर वेगाने ग्रामस्थांच्या दिशेने नेला. विपुल गोसावी व मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलले, तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

    डंपर शरद पाटील यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर चौघेही कार व डंपरसह अमळनेरच्या दिशेने पसार झाले. जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेने अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ज्ञानेश्वर गोसावी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुरनं. ५६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९, ३५१(२), ३५२ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे पुढील तपास करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif