Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू!
    अपघात

    एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू!

    उन्हाळा पक्ष्यांच्या जीवावर उठला : अमरावतीत उष्माघाताचे तीन बळी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2026No Comments190 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा उकाडा वाढतच आहे. हा उकाडा काही केल्या थांबताना दिसत नाही. राज्यात उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कालच अमरावतीत उष्माघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मनुष्यच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांनाही या महाभयंकर उकाड्याचा त्रास जाणवत आहे. गडचिरोलीत तर भयानक उन्हामुळे एक दोन नव्हे तर 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकाचवेळी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवाघळं मरण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.

    गडचिरोली जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ आली आहे. त्यामुळे गडचिरोलीत 500 च्या वर वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमानात आठ दिवसापासून वाढ झाली असून सध्या 46 डिग्री तापमानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे. जंगलातील वन्य प्राणी असो की पक्षी असो सर्वांनाच तापमानाचा तडाखा सहन न करता आल्यामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

    सिरोंचा वनविभागातील परिसरात चिंचाच्या झाडावर नेहमीच वटवाघूळ वास्तव्य करीत असतात. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून या चिंचाच्या झाडावर वटवाघळांचा जत्थाच मुक्कामाला असतो. त्यामुळे हे चिंचाचं झाड वटवाघुळांचा अड्डा म्हणूनही ओळखलं जातं. पण जिल्ह्यात पहिल्यांदाच या पक्ष्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात 46 डिग्री तापमान झाल्याने वटवाघळांनाही हे तापमान सहन झालं नाही. त्यामुळेच हे पक्षी मरण पावले. एकाच वेळी 500 हून अधिक वाटवाघळं मरून पडली होती.

    झाडाच्या खाली वटवाघळे मृतावस्थेत पडली होती. काही वटवाघळे झाडावरच पडून होती. अचानक जंगलातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लोकांनी पाहिल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर काही गावकऱ्यांनी जेसीबीच्या सह्याय्याने खड्डा खोडून मरण पावलेल्या सर्व वटवाघळांना पुरून टाकलं. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी दिली. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात हाय व्होल्टेज तापमान नोंदवले जात आहे. दुपारी 1 वाजता 46 डिग्री तापमानाची नोंद झाली. प्रचंड ऊन असल्याने राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते रिकामे झाले होते. भयंकर ऊन असल्याने लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. दुपारच्या एक वाजताच उन्हाचे जोरदार चटके नागरिकांना सहन करावे लागत होते. गडचिरोली जिल्ह्यातील शहरी भाग असो वा ग्रामीण भाग असो कोणत्याही ठिकाणी 46 च्यावर तापमानाची नोंद झालेली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif