लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगाबाद – जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे पाच विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर बुडाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघांना वाचवण्यात यश आले आहे.
साने गुरुजी विद्यालयाचे ७० विद्यार्थी आणि पाच शिक्षक सोमवारी सहलीसाठी रायग़ड जिल्ह्यात आले होते. दुपारी बारा वाजता हे सर्व जण मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर उतरले होते. समुद्र स्थानाचा आनंद घेत असतांना, पाण्याचा अंदाज न आल्याने, यातील पाच जण बुडाले. स्थानिक बचाव पथकांनी तिघांना वाचविण्यात यश आले. उर्वरित दोघे बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु होता. अखेर दोघांचा मृतदेह तपास पथकाला आढळून आले आहेत.
प्रणव कदम आणि रोहन बडवाल अशी दुर्घटनेत बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. बचावलेल्या विद्यार्थ्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षापुर्वी मुरुड समुद्र किनाऱ्यावर झालेल्या दुर्घटनेत पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post