Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»विजेचा ताण कमी करण्यासाठी 5 नवीन सबस्टेशन
    ताज्या बातम्या

    विजेचा ताण कमी करण्यासाठी 5 नवीन सबस्टेशन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 5, 2026No Comments343 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महापौर काळेंचा पुढाकार : अधिकाऱ्यांची घेतली बैठक

    जळगाव – शहरातील वाढत्या विजेच्या ओव्हरलोडच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी पुढाकार घेत सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत शहरात प्रस्तावित असलेल्या पाच नवीन सबस्टेशन उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कामांना लवकरच गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    बैठकीला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, अधिकारी अजय वाणी, देवेंद्र भंगाळे, चेतन सोनार, महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे संदीप मोरे उपस्थित होते. यावेळी शहरातील विजेच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. महावितरण विभागाकडून यापूर्वीच काही सबस्टेशनचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते आणि त्यांना मंजुरीही मिळाली होती. मात्र, मागील प्रशासकीय कार्यकाळात या प्रस्तावांची अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांना विजेच्या तक्रारींना सामोरे जावे लागत होते. महावितरण आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही कामे प्रलंबित राहिल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.
    या पार्श्वभूमीवर महापौरांनी पुढाकार घेत सबस्टेशन उभारणीसाठी पर्यायी जागांची यादी महापालिकेकडून सादर केली आहे. या जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्त दौरा करणार आहेत. पाहणीनंतर तातडीने अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. शहरातील वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही पाच नवीन सबस्टेशन उभारणीची योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, यामुळे ओव्हरलोडची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    September 15, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif