5 कोटींची घड्याळांच्या जप्तीवर हार्दिक पांड्याचा खुलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

क्रिकेट जगतात चर्चेत असणारा हार्दिक पांड्या सध्या नव्या वादात सापडला आहे. मुंबई विमानतळावर त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. दरम्यान, त्याने ट्विट करत यासंदर्भातखुलासा केला आहे. यूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्या याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या दोन घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे.

हार्दिक पांड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पांड्या याच्याकडे नव्हती अशी माहिती समोर आली आहे. यासर्वांवर पांड्याने ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाला पांड्या.. 

15 नोव्हेंबर रोजी सकाळी दुबईहून मुंबईला पोहोचल्यावर, मी दुबईहून आणलेल्या मालाचे कस्टम ड्युटी भरण्यासाठी विमानतळावरील कस्टम काउंटरवर गेलो. सोशल मीडियावर माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे.

विमानतळावर उपस्थित असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांना मी स्वतः सर्व सामानाची माहिती दिली आहे. तसेच, कस्टम विभागाने माझ्याकडे सर्व कागदपत्रे मागितली. सध्या ते योग्य कर्तव्याचे मूल्यमापन करण्यात गुंतले आहेत. मी पूर्ण शुल्क भरण्यास तयार आहे आणि सोशल मीडियावर घड्याळाची जी किंमत ५ कोटी सांगितली जात आहे, ती चुकीची आहे.

या घड्याळाची किंमत दीड कोटी रुपये आहे.   हार्दिक पांड्या म्हणाला की, मी देशाचा कायदा पाळणारा नागरिक आहे आणि सरकारच्या सर्व यंत्रणांचा आदर करतो. मला मुंबई सीमाशुल्क विभागाचे पूर्ण सहकार्य लाभले आहे आणि मी दुबईहून आणलेल्या मालाचे मूल्यांकन आणि बिल आणि सर्व कागदपत्रे यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. असे त्याने ट्विट करत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here