Thursday, September 29, 2022

धक्कादायक; चौथीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

- Advertisement -

 

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;   

- Advertisement -

- Advertisement -

तालुक्यातील दहिगाव (संत) येथे राहत असलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दहिगाव (संत) ता. पाचोरा येथील गौरव प्रविण पाटील (वय – ११) याने घरातील दरवाजा आतून बंद करून छताला दोरी बांधून गळफास घेतला. वडील प्रविण नथ्थू पाटील हे सपत्नीक नाशिक येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेलेले असताना ही दुदैवी घटना घडली. घरी गौरव व मोठा मुलगा कॄष्णा यांची जबाबदारी आपले भाऊ रविंद्र पाटील यांच्या कडे सोपविली होती. कृष्णा हा बाहेरून घरी परतल्यावर त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केले मात्र आतून दार बंद असल्याने त्याने काका रविंद्र पाटील यांना ही माहिती देताच पाटील यांनी घराकडे धाव घेत दरवाजा तोडून आत बघितल्यावर गौरव हा छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

या बाबत दहिगाव पोलिस पाटील विकास कोमलसिंग पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नयन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन पवार हे करीत आहेत. या दुदैवी घटनेने दहिगाव सह परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या