ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन

0

पुणे – ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी (19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मराठी, हिंदी सिनेमा, नाटकांबरोबर टीव्ही मालिकांमधूनही डॉ. लागू यांनी अभिनय केला आहे. रंगभूमीवर गाजलेल्या “नटसम्राट’ या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर या भूमिकेमुळे आणि “हिमालयाची सावली’ मधील अभिनयामुळे त्यांना नटसम्राट म्हणूनच संबोधले जाऊ लागले होते. याशिवाय “पिंजरा’, “देवकी नंदन गोपाला’, “सिंहासन’, “सुगंधी कट्टा’ अशा मराठी चित्रपटांबरोबरच “अरविंद देसाई की अजीब दास्तान’, “और एक दिन अचानक’, “घर संसार’ यासारख्या सुमारे 100 चित्रपटांमधून अभिनय केला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान-नाक-घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे काम केले. नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. अभिनय केला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.

लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.