40 लाख निधीतून होणार रस्ता; आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असताना आमदार अनिल पाटलांनी एस. आर प्रोग्रॅम अंतर्गत या रस्त्यासाठी 40 लाख निधी मंजूर केल्याने अतिशय थाटात या रस्त्याचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले.

दहिवद हे तालुक्यातील मोठे गाव असताना गेल्या चार पाच वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने येथून जाताना ग्रामस्थांची कसरत होत होती, यामुळे आमदारांनी हा प्रश्न मनावर घेऊन निधी मंजूर करून आणल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच सुषमा देसले आणि  ग्रामस्थांनी नवीन पाणीपुरवठा व रस्ता काँक्रीटीकरनाची मागणी केली, तर धनगर समाजाने स्मारकाची मागणी केली, ही सर्व कामे येत्या काळात पूर्ण करण्याची ग्वाही आमदारांनी दिली.

यावेळी लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष देसले, माजी जि. प. सदस्य अशोक पाटील, जयवंत गुलाबराव पाटील, मार्केटचे प्रशासक सदस्य एल. टी. पाटील, उपसरपंच बाळू आत्माराम पाटील, माजी उपसरपंच सुनिल पाटील, ग्रा. प. सदस्य शिवाजी पारधी, वर्षा पाटील, रेखाबाई पाटील, रवींद्र माळी, दत्तात्रय देसले, गोकुळ माळी, किशोर पाटील, सुकलाल पारधी, बापू सोनवणे, भिला नाना, संजय देसले, ईश्वर माळी, भुषण भदाणे, गुलाब पाटील, बापू पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गुलाब सर, दिलिप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भानुदास लोहार, दिलीप माळी, भाऊराव पाटील, स्वप्निल पाटील, नरसिंह देसले, सुधाकर पाटील, आनंदा पाटील, राजेंद्र पारधी, भिकन सोनवणे, राहुल माळी, बाळू सोनार, नाना पाटील, पंडित पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर काम मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here