4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले सोन्याचे दर ; जाणून घ्या आजचे नवे दर

0

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात व्यापार सत्रात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत.  व्यापार सत्रादरम्यान, जून वायदा सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 0.27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर, जुलै वायदा चांदीच्या किंमतीत प्रतिकिलो 0.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोन्याचा नवा दर : 

सोमवारी एमसीएक्सवरील जून वायदा सोन्याची किंमत 131 रुपयांनी वाढून 48,535 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. मागील व्यापार सत्रात, 10 ग्रॅम सोन्याचे दर 0.22 टक्क्यांनी घसरले होते.

चांदीची नवीन किंमत: 

व्यापार सत्रादरम्यान जुलै वायदा चांदीची किंमत 418 रुपयांनी वाढून 71,467 रुपये प्रति किलो झाली. गेल्या व्यापार सत्रात चांदीच्या किंमतीत 1.7 टक्क्यांनी घट झाली होती.

4 महिन्यातील उंच झेप

क्रिप्टोकरन्सीमध्ये घट झाल्यामुळे सेफ-हेवन मेटलकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहेत. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किंमती सुमारे 4 महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचल्या आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 0.2 टक्क्यांनी वधारून 1,883.21 डॉलर झाला, तर तो 0.4 टक्क्यांनी वाढून 27.64 डॉलर प्रति औंस झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.