Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»खरातला 39 आमदार भेटले, मग मीच का टार्गेट?
    महाराष्ट्र

    खरातला 39 आमदार भेटले, मग मीच का टार्गेट?

    माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जळफळाट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 30, 2026No Comments244 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी खळबळजनक विधान करत स्वतःवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. “अशोक खरातला 39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?” असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.

    दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशोक खरातसोबत केसरकर यांचे फोटो समोर आल्यानंतर अंधारेंनी गंभीर आरोप करत प्रकरण अधिक तापवले आहे. अंधारेंनी सिन्नर एमआयडीसीमधील नामकर्ण आवारे या व्यक्तीसोबतचे केसरकर यांचे फोटोही दाखवले. आवारे हा एका पतसंस्थेच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत असल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी केसरकर यांच्यावर अशोक खरातसोबत पूजा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना केसरकर यांनी “मला मुद्दाम टार्गेट केलं जात आहे,” असे म्हटले.

    या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच चिघळले असून, अंधारे यांनी केलेल्या आरोपांना केसरकर कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.