रायपूर :- छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. डीआरजीचे दोन जवान या चकमकी दरम्यान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
#UPDATE Five Maoists have been killed in encounter with security forces in Narayanpur,Chhattisgarh https://t.co/a7hbBZ4Ei7
— ANI (@ANI) August 24, 2019
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.