Live : एकनाथ शिंदेंसह 35 आमदार गुजरातमध्ये दाखल

0

मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे सरकार संकटात आलं आहे. ठाकरे सरकारला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आव्हान मिळालं आहे. शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सूरतमध्ये असल्याची माहिती सुरूवातीला आली होती. मात्र नाराज आमदारांची संख्या मोठी आहे. शिवसेनेचे 30 ते 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्यानं माध्यमांशी बोलताना दिली आहे.
उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहे. आमदार चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळख जातात. सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते.चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद आहेत.
बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील २ आमदार सोबत आहे. ठाण्यातील 2 आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.