भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञ उत्साहात पार पडत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील जामनेर रोडवरील धन्वंतरी ब्लड बँकेत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 202 दात्यांनी रक्तदान केले, तर वरणगाव येथील दुसऱ्या शिबिरात 138 दात्यांनी सहभाग घेतला. यामुळे एकूण 340 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक पिंटू कोठारी, प्राचार्य संजय शुक्ला, बालरोग तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी महाजन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जानवी पाटील, ॲड. तुषार पाटील, ॲड. कैलास लोखंडे , नगरसेवक दिनेश नेमाडे यांची विशेष उपस्थिती होती.
भुसावळ तालुका सेवा समिती आणि स्व-स्वरूप संप्रदाय भक्त-शिष्य-साधकांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. या रक्तदान उपक्रमातून अनेकांना जीवनदान मिळणार असून याचा सामाजिक संदेशही पोहोचला आहे. रक्तदान महायज्ञ हा एक कौतुकास्पद उपक्रम ठरला असून नागरिकांनी भविष्यातही अशा उपक्रमांना सक्रिय सहभाग द्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.