Saturday, October 1, 2022

दोंडाईचामधून 30 लाखाचा गांजा हस्तगत; तिघे संशयीत फरार

- Advertisement -

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

दोंडाईचा शहरातून तब्बल 336 किलो गांजा पकडण्यात आला आहे. डीआयजी पथक नाशिक परिक्षेत्र आणि दोंडाईचा शहर पोलिस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. या गांजाचे बाजारमुल्य 30 लाख 26 हजार 790 रुपये एवढे आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या कारवाईदरम्यान तिघे संशयीत फरार झाले असून त्यातील एकाचे नाव निलेश राजु मराठे रा. शिवराय चौक दोंडाईचा जिल्हा नंदुरबार असे निष्पन्न झाले आहे. त्याच्यासह त्याचे दोघे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहे. पोलिस पथक तिघा आरोपींच्या मागावर आहे.

सदर कारवाईत दोंडाईचा पोलिसांसह डीआयजी पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, स.पो.नि. सचिन जाधव (शिर्डी शहर वाहतुक शाखा), सहायक फौजदार रामचंद्र बोरसे (पोलिस मुख्यालय जळगाव), पोलिस नाईक प्रमोद मंडलिक, हे.कॉ. सचिन धारणकर, कुणाल मराठे, पो.कॉ. सुरेश टोंगारे आदींनी सहभाग घेतला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या