लोकशाही न्यूज नेटवर्क

तामिळनाडूमधील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोमवारी विधानसभेत महिलांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा केल्याचे वृत्त आहे.
या घोषणेनुसार, राज्यातील महिलांना दरवर्षी ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासोबतच महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना घरगुती खर्चात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गॅस सिलिंडरवरील खर्च कमी होण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचा मोफत लाभ मिळणार असल्याने महिलांना आर्थिक फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या दैनंदिन खर्चाचा भार कमी करण्यासाठी या योजनांकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.


