3 लाख रुपये माहेरून आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ

0

एरंडोल : – आय टी आय  सुरू करण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे या मागणीसाठी येथील माहेरवाशिन असलेल्या वैशाली स्वप्नील चौधरी यांचा यांचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून चारित्र्यावर संशय घेतल्याची तक्रार पोलीस स्टेशनला मंगळवारी दाखल करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये वैशाली चौधरी यांचे पती स्वप्निल अरुण चौधरी यांचेसह अरुण बाजीराव चौधरी, कमला अरुण चौधरी, राजश्री अभिजित चौधरी महेंद्र  अरुण चौधरी  डॉक्टर मधुकर चौधरी यांचा समावेश आहे.

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला भाग 5 गुरं नंबर 89/20 भादवि कलम 498  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व राजीव पाटील अखिल मुजावर हे पुढील तपास करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.