खान्देशचे प्रति पंढरपुर शेंदुर्णीचा उद्या २८० वा रथोत्सव

0

शेंदुर्णी ता. जामनेर

खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीमध्ये संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने सोन नदीच्या काठावर भव्य यात्रा सुद्धा या निमित्ताने भरत असते.

सकाळी ११ वाजता रथाची ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वे गादी वारस ह. भ. प. शांताराम महाराज भगत मा. मंत्री. गिरिशभाऊ महाजन भाजपचे नेते संजयदादा गरुड, सौ. सरोजिनी गरुड गोविंद अग्रवाल, अमृत खलसे मा. नगराध्यक्षा विजयाताई खलसे, जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा मान्यवर नेते पदाधिकारी यांच्या हस्ते महापुजा व आरती करण्यात येणार आहे.

१५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२. ००वाजता रथाची पूजा आरती करून रथ मार्गस्थ होईल. यात भाविक नागरिक ग्रामस्थ, भालदार चोपदार शेंदुर्णी व पंचक्रोशीतील भजनी मंडळ महिला भजनी मंडळ, शहाबाद्याच्या गाडीवर पौराणिक देखावे आदींचा सहभाग असतो. जागोजागी रथाची पुजा करण्यात येते. नवसाला पावणारा हा रथ असुन नवस फेडण्यासाठी भाविक रथाला नारळाचे तोरणं बांधत असतात. रथावर केळी वाहण्याची प्रथा आहे यामुळे शेंदुर्णी शहरात मोठ्या प्रमाणावर केळीची विक्री होत असते.

 

भव्य यात्रा…

रथोत्सवाच्या निमित्ताने सोन नदीच्या काठावर भव्य यात्रा भरली असुन यात हॉटेल्स, करमणुकीचे खेळ, विविध दुकाने, सिनेमागृहे, तमाशा मंडळे यामुळे १५ दिवस मोठी यात्रा भरत असते यात लाखों रुपयांची व्यवसायात उलाढाल होत असते. शेंदुर्णीकर नोकरी व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे शेंदुर्णीकर आवर्जुन उपस्थित राहत असतात. माहेशराशीय मुली, जावाई सुद्धा रथोत्सवाला हमखास येतात. तरी भाविकांनी या रथोत्सव व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वेळ गादी वारस ह. भ. प. शांताराम महाराज भगत, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व ग्रामस्थ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.