नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत 61 हजार 267 नवे रुग्ण सापडले तर, 884 लोकांचा मृत्यू झाला. सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा कमी झाला आहे.देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 66 लाख 85 हजार 083 झाली आहे.
आतापर्यंत देशात 1 लाख 3 हजार 569 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 75 हजार 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह एकूण 56 लाख 62 हजार 491 लोकं आतापर्यंत निरोगी झाली आहेत. गेल्या 26 दिवसांपासून भारताचा अॅक्टिव्ह रेटमध्ये घट झाली आहे. 10.17 लाखवरून आता सध्या देशात 9.19 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आकडे पाहिल्यास गेल्या एका महिन्यात 4 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत 28.77 लाख नवे रुग्ण वाढले. तर, 27.91 रुग्ण निरोगी झाले आहेत.
ICMRने दिलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑक्टोबर पर्यंत एकूण 8 कोटी 10 लाख 71 हजार 797 सॅंपल टेस्ट केले गेले आहेत. यातील 10 लाख 89 हजार टेस्टिंग काल करण्यात आली. सध्या देशात पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के आहे.