Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»मटणाच्या जेवणामुळे २३ विद्यार्थ्यांना विषबाधा?
    आरोग्य

    मटणाच्या जेवणामुळे २३ विद्यार्थ्यांना विषबाधा?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 20, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सांगलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. निवासी शाळेतल्या २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

    सांगलीतील विटा येथे ही घटना घडली आहे. विट्यातल्या एका शासकीय निवासी शाळेत तब्बल २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आज सकाळी (२० जानेवारी) पोटदुखी, मळमळ आणि जुलाब असा त्रास सुरु झाल्यानंतर सर्व आजारी विद्यार्थ्यांना विट्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली.

    रविवारी (१९ जानेवारी) रात्री निवासी शाळेत विद्यार्थ्यांना जेवणात मटण देण्यात आले होते. या मटणाच्या जेवणामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. तरी पोलिसांनी या प्रकाराचा तपास करायला सुरुवात केली आहे. सर्व २३ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

    सांगलीतल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा कशी झाली याचा शोध स्थानिक पोलीस करत आहेत. या प्रकरणात दोषीचा शोध घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे. एकाच वेळी २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    #student Diarrhoea Food Mutton Nausea poisoning Sangli Stomach ache
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हंता व्हायरसचा प्रादुर्भाव : लॉकडाऊन लागणार का?

    May 11, 2026

    मृत्यूच्या दारातून परतला जीव : तरुणावर यशस्वी उपचार

    April 30, 2026

    उन्हाळ्यात मुलांना घरगुती पेय द्या!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif