जळगाव- इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने माजी जिल्हाधिकारी, सचिव मदत व पुनर्वसन महाराष्ट्र शासन श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या पदोन्नती निमित शुभचिंतन सोहळा “रेडक्रॉस भवन”, न्यू.बी.जे.मार्केट येथे शनिवार दिनांक 23 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी किशोर राजे निंबाळकर यांचा सहपरिवार सन्मान सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सर्व रक्तदान शिबीर आयोजक, रक्तदाते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था चे पदाधिकारी सर्व शुभचिंतक आणि माननीय श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व जळगावकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.
23 रोजी किशोरराजे निंबाळकर यांचा सन्मान सोहळा
- Advertisement -
- Advertisement -