Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»पीक नुकसानीसाठी 2 हजार 215 कोटींची मदत जाहीर
    कृषी

    पीक नुकसानीसाठी 2 हजार 215 कोटींची मदत जाहीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 23, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रात अतिवृष्टीने 70 लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. शाळा, घराचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या कॅबिनेट बैठक सुरू आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे. पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर झाली आहे. पीक नुकसानीसाठी मदत म्हणून 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मदत व पूनर्वसन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला. खरीप 2025 साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

    राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हाहाकार घातला आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने तडाखा दिला आहे. त्याचा आढावा सरकार सातत्याने घेत होतं. यापूर्वी विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. तर आता विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. यापूर्वीच्या नुकसानीचे आणि आताचे पंचनामे हे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार 32 लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात झाले आहे.

    त्यासाठी 2,215 कोटींच्या मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. हा निधी आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करता येईल. यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील धाराशिवसह नांदेड आणि बीडमध्ये मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पट्ट्याचा समावेश आहे. तर आता पावसामुळे जे नुकसान झाले आहे. त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार विरोधी पक्ष करत आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची, जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी तयार करण्यात आली आहे. युद्धपातळीवर ही मदत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अनेक भागात अद्यापही पाणी आहे, त्यामुळे तिथे पंचनामे झालेले नाहीत. पाणी ओसरल्यावर याठिकाणचे पंचनामे करण्याचे कामही करण्यात येणार आहे.

    दरम्यान सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकार 1 हाजर 339 कोटींची मदत देणार आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. जून ते ऑगस्ट 2025 या काळात जे पंचनामे केले, त्याआधारे ही मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर बीड, धाराशिवसह काही जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरात अडकलेल्या गावातील नागरिकांची सुटका करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif