220 टन कचर्‍यासाठी मनपाची स्वच्छ शहर निविदा प्रक्रिया सुरु

0

100 घंटागाड्या,12 रिसीप्ट कॉमपॅक्टर, 6 टीपर मनपा पुरविणार

जळगाव दि. 28-
शहरात दररोज निघणार्‍या 220 टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छ शहर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन 2016 नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सदर एकमुस्त ठेक्यासाठी 5 वर्षांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सदर ठेक्यात महानगरपालिकेतर्फे शंभर घंटागाड्या, 12 रिसिप्ट कॉमपॅक्टर, 6 डीपर (डंपर) मक्तेदाराला पुरविण्यात येणार आहे. सदर वाहनांची देखभाल दुरुस्ती स्वत: मक्तेदाराने करावयाची आहे. पाच वर्षानंतर मनपा सुस्थितीत वाहने परत घेणार आहे. मक्तेदाराला घरातील, रस्त्यावरील, उपहारगृह, व्यापारी संकुलातील ओला व सुका कचरा घनकचरा प्रकल्पापर्यंत पोहोचवायचा आहे.
आठशे कामगार राबविणार प्रक्रिया
सदर निविदेत चारशे कर्मचारी मक्तेदाराचे तर चारशे कर्मचारी मनपाचे राहणार आहेत, अशी अट आहे. प्रत्येक प्रभागात 42 कर्मचार राहणार आहेत. सदर ठेक्यासाठी पाच वर्षांकरिता 75 कोटीची अमानत असून 15 कोटी वर्षाला तर सव्वा कोटी महिन्याला खर्च अपेक्षित आहे.
220 टन कचरा हाताळण्याचा अनुभव
शहरात 220 टन कचरा दररोज निघतो. तो हाताळण्याचा मक्तेदाराला अनुभव असावा. चारशे कामगार पुरविण्याचा अनुभव असावा, किमान वेतन कायद्यानुसार द्यावे, शहरात स्वच्छतेचा प्लॅन मार्ग सादर करावा, सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कामाची वेळ असेल, प्रत्येक घंटागाडीला किमान पंधराशे घरांचा कचरा उचलावा लागेल, स्लम एरियात ढकलगाडी वापरावी, तक्रार आल्यास 12 तासातच निपटारा करावा लागेल, वाहनांना जीपीएस यंत्रणा असावी, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आदी सुट्यांशिवाय 365 दिवस काम असेल त्यात खंड पडल्यास व कर्मचार्‍यांबाबत अन्याय असेल तर तीव्र दंडात्मक स्वरुपाची कारवाईची तरतूद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.