२० वर्षीय विवाहितेची माहेरी आत्महत्या…

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;  

माहेरी रक्षाबंधनासाठी आलेल्या २० वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुकयातील शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक मुलगी उमा नानू फादगे (२०) हिचा विवाह जळगांव शहरातील खंडेराव नगर येथील रहिवाशी सनी प्रेमनाथ उमप याच्याशी दि. १८ मे २०२२ रोजी शेवाळे गावात मोठ्या थाटात झाला होता. रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी म्हणुन दि. १२ आॅगस्ट २०२२ रोजी उमा हिचे वडिल नानू फादगे हे उमाला माहेरी घेऊन आले होते.

दरम्यान रात्री उमा ही गावातच वास्तव्यास असलेल्या आपल्या मावशी शिलाबाई गायकवाड यांच्याकडे झोपण्यासाठी गेली होती. दि. १३ आॅगस्ट रोजी उमा आपल्या वडिलांच्या घरी परतली. आंघोळीसाठी जायचे आहे असे सांगुन घरातील स्नानगृहाकडे गेली. मात्र उमाला उशीर का लागतोय हे पाहण्यासाठी वडिल नानू फादगे यांनी घरात शोध घेतला असता घरातील स्वयंपाक घरात उमा ही दोरीच्या सहाय्याने फाशी घेतलेल्या अवस्थेत वडिलांना आढळुन येताच वडिल नानू फादगे यांनी एकच आक्रोश केला. उमा हिला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी उमा हिस मृत घोषित केले. उमा सनी उमप या विवाहितेने आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल राकेश खोंडे हे करित आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here