अमळनेरकरांसाठी आमदार निधीतून २ स्वर्गरथ…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता अंत्ययात्रेसाठी लागणारे 2 स्वर्गरथ आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 24 लक्ष निधीतून हे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केले असून, याचा लोकार्पण सोहळा आमदारांच्या हस्ते नगरपरिषदेत पार पडला. यावेळी आमदारांनी दोन्ही स्वर्गरथच्या चाव्या मुख्याधिकारी यांच्या स्वाधीन केल्या.

याप्रसंगी जि.प सदस्या जयश्री अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, कार्याध्यक्ष विनोद कदम, प्रा.अशोक पवार, महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, धरणगाव निरीक्षक आशा चावरीया, जिल्हा उपाध्यक्ष संजय भीला पाटील, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक राजेश पाटील, संजय पाटील, यज्ञेश्वर बाविस्कर, नगरसेवक दीपक पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, नगरसेवक निशांत अग्रवाल, नगरसेवक श्याम पाटील, जयवंत पाटील, सुरेश पाटील, विजय जैन, रणजित पाटील, इम्रान खाटीक, आबीद मिस्तरी, रफिक मिस्तरी, मुशीर शेख, बाळू पाटील, राजेंद्र देशमुख, दिनेश कोठारी,भुषण भदाणे, सुनिल शिंपी, प्रवीण देशमुख, यतीन पवार, ललित बोरसे, सचिन वाघ, वसीम पठाण, भुरा पारधी, योगेश पाटील यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.