मविआचे बोदवड तहसील कार्यालयासमोर २ दिवसीय उपोषण…

0

 

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील रिक्त असलेली ग्रामसेवक पदांची भरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी तालुका महाविकास आघाडीतर्फे बोदवड तहसिल कार्यालयासमोर दि.१३ रोजी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून उद्या दि.१४ रोजी ही उपोषण सुरु राहणार आहे. त्यानंतर दि.१५ रोजी पंचायत समितीला टाळे लावण्यात येणार असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

तालुक्यात एकुण ५१ गावं आहेत त्यात पुरेसे ग्रामसेवक नसल्याने नागरिकांना शासकीय कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. विशेष त्यात जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडे इतर तीन ते चार ग्रामपंचायतीचा प्रभारी कारभार असल्याने त्यांना सुध्दा अडचणी निर्माण होत असून नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. प्रशासनाने तात्काळ तालुक्यात रिक्त असलेली ग्रामसेवक पदांची भरती करावी अन्यथा या दोन दिवसीय उपोषणा नंतर दि.१५ रोजी पंचायत समितीला टाळे लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

उषोषणवेळी विजय चौधरी, कैलास चौधरी, भरत पाटील, प्रदिप बडगुजर, गजानन खोडके, विरेंद्रसिंग पाटील, गणेश पाटील, रामराव पाटील, सचिन राजपूत, दिपक वाणी, सुनिल बोदडे यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.