तोंडापूर ता जामनेर-
येथील अवैध धंदे सट्टा पत्ता दारु पुन्हा जोमात सुरु झाले असून पहुर पोलिस जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे
तोंडापूर येथे अवैध धंदे पोलिसात तक्रार करुन हि बंद होत नसल्याने मागील महिन्यात महिलांनि पहुर पोलिस स्टेशन गाठत थेट पोलिस निरीक्षक मोहन बोरसे याच्याकडे ठिय्या मांडल्या ने बऱ्याच दिवसापासून बंद असलेले सट्टा पत्ता व दारु पुन्हा जोरात सुरू झाले आहे बसस्थानक परिसरात सर्रासपणे सट्टा बिंधास्तपणे घेतला जात असून गावाच्या बाहेर खेळला जात असलेला पत्ताचा कल्ब गावात बिंधास्तपणे सुरू झाला आहे देशी दारु चि विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून पोलिस प्रशासन च्या अधिकारी मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने गावात भांडन तंटे च्या प्रमाणात वाढ झाली आहे सटटा व पत्ता खेळण्यास घरातील धान्य विकुन आमचे नवरे घराची राख रांगोळी करीत असल्याची व घरात मारहाण प्रकार वाढत असल्याची तक्रार महिलानि जल संपदा मंत्री गिरीष महाजन याच्याकडे मांडल्याने तोंडापूर येथील अवैध धंदे बंद करण्यात आले होते मात्र गेल्या कित्येक दिवसापासून पुन्हा जोरात सुरू झाले आहे गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत जात नसुन त्याचावर दबाव तंत्राचा वापर अवैध धंदेवाईक करीत असल्याचे दक्षता समिती च्या सदस्य मधून बोलले जात आहे दहा ते बारा लोकसंख्या असलेल्या बाजारपेठच्या गावात आठवडे बाजाराच्या दिवशी पोलिस हजर राहत असून बसस्थानक परिसरात त्याच्या समोर सर्रासपणे धंदे सुरु असल्याने व पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ वर्गातून संताप व्यक्त होत आहे