जळगाव- फुले मार्केट व सेंल फुले मार्केट येथील 18 गाळेधारकांनी गुरुवारअखेर तब्बल 97 लाखाची थकबाकी जमा केली असल्याची माहिती उपायुक्त महसूल डॉ. उत्कर्ष गुटे यांनी दै. लोकशाहीस दिली. सोमवारपासून कारवार्इ गाळेधारकांना आपल्याकडील थकबाकी जमा करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे आज दि. 11 रोजी आणखी काही गाळेधारक थकबाकी जमा करण्यासाठी मनपात येतील. वारंवार सूचना देवूनही ज्या गाळेधारकांनी थकबाकी जमा केलेली नाही त्यांच्यावर सोमवारी कारवार्इ करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ. गुटे यांनी दिली.