16 दुकानांची तपासणी 55 किलो प्लॅस्टीक नॉन ओवन बॅग जप्त

0

जळगाव :-मनपाच्या आरोग्य विभागाने शहरातील दुकान संकुलातील 16 दुकानांची अचानक तपासणी करुन 55 किलो नॉन ओवन बॅग जप्त केल्या.

राज्य शासनाच्या 5 मे 2018 च्या प्लॉस्टीक व थर्माकोल उत्पादन बंदीनुसार शहरातील 16 दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी फुले मार्केटमधील गोपाल बोरडा व सुभाष चौकातील जवाहर प्लॉस्टीक येथे 55 किलो नॉन ओवन बॅग जप्त केल्या याप्रकरणी दोघांना प्रत्येकी 5 हजार असा 10 हजाराचा दंड पथकाकडून वसूल करण्यात आला. ही कारवाई आयुक्त डॉ. उदय टेकाळे, आरोग्याधिकारी उदय पाटील, डॉ. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रभाकर वावडे, संजय अत्तरदे, डी.डी. गोडाले, आर. व्ही. कांबळे, रफीक शेख, भारत ढंढोरे आदींनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.